महिला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर संधीचं सोनं करून दाखवेन – रुपाली पाटील ठोंबरे

151 0

रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. आज त्यांनी राजीनामा दिला आहे.

मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे. जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करताना ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पेलली. एका व्यक्तीला दोन पदे असू नयेत म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, असं त्यांनी सांगितलं.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत. महिलांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी तत्परतेने काम केलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेन, असं रूपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलंय.

Share This News

Related Post

गृहप्रकल्पांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी विशेष मोहीम ; ऑगस्टमध्ये किमान १ हजाराचे लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश

Posted by - July 25, 2022 0
पुणे : मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्यादृष्टीने महत्वपूर्ण बाब असून त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत…

मॅगीनंतर आता गव्हाचे पीठ आणि बिस्किटेही महागली

Posted by - March 16, 2022 0
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई झपाट्याने वाढत आहे. रशिया, युक्रेनला युरोपचे ‘ब्रेड बास्केट’ म्हटले जाते. जागतिक बाजारपेठेत 29 टक्के…

ई-बाईक चार्ज करताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शोरूम जळून भस्मसात ; 8 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - September 13, 2022 0
तेलंगणा : हैदराबाद मधील सिकंदराबाद येथे एका इलेक्ट्रिक बाइक शोरूम मध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी…
Baramati Died

ट्रॅक्टर अंगावर उलटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2023 0
बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये (Baramati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022 0
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *