पुणे- पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. विविध संघटनांनी याबाबत आक्षेप नोंदवला असून पालिका आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.
महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांच्या सासू कै. लक्ष्मीबाई नारायण हरीहर असा फलक लावण्यात आलेला आहे. त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल माळी प्रबोधन समिती यांनी आक्षेप घेतला आहे. या फलकावर मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचं नाव आहे तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव आहे.
दरम्यान, कमानीवर नाव लावण्याचा विषय आम्ही नाव समितीत मंजूर करून घेतल्याचे हरीहर कुटुंबांनी सांगितले आहे. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहावे लागेल.