आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अॅनिमेटेड डूडलद्वारे गूगलने दिल्या अनोख्या शुभेच्छा

300 0

आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत गुगलने खास डूडल बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.

गुगलने एक आकर्षक आणि सर्जनशील डूडल तयार केले आहे. या अॅनिमेटेड डूडलमध्ये महिलांचा संयम, त्याग यासोबतच त्यांच्या आत्मविश्वासाचेही चित्रण करण्यात आले आहे.

गुगलच्या होमपेजवर विविध संस्कृतींमधील महिलांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या अॅनिमेटेड स्लाइडशोसह एक आकर्षक डूडल दिसत आहे. नोकरी करणाऱ्या आईपासून ते मोटार मेकॅनिकपर्यंत या डूडलची शैली अतिशय मनोरंजक आहे.यामध्ये एक महिला घराची काळजी घेण्यापासून ते अवकाशापर्यंत सर्व काही कसे हाताळू शकते हे दाखवण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत, ज्यांना त्या उत्तम प्रकारे सामोरे जात आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या समाजातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना अधिकारांची जाणीव करून देणे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता’ आहे.

Share This News

Related Post

वरुणराजा बरसणार ! पुढच्या ३-४ तासांत राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना प्रतीक्षा आहे ती पावसाच्या थंड शिडकाव्याची. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह…

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी ‘आयएएस’ अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयानं काय दिला निर्णय?

Posted by - August 12, 2024 0
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून पूजा खेडकरला तात्काळ अटक करू नये…

बारामतीत भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ )

Posted by - May 18, 2022 0
बारामती- बारामतीतील मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू…

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी दोन पोलीस निलंबित (व्हिडिओ)

Posted by - February 11, 2022 0
पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

जगदीप धनखर भारताचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली असून एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *