नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली असून एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखर यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते रद्द करण्यात आली. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे . धनखर 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील.
Delhi | NDA candidate Jagdeep Dhankar won by 346 votes as he bagged 528 of the total 725 votes that were cast. While 15 were termed invalid, Opposition candidate Margret Alva received 182 votes in the election: LS Gen-Secy Utpal K Singh pic.twitter.com/ZNHcbmftAU
— ANI (@ANI) August 6, 2022
71 वर्षीय धनखर यांना पाहिल्या पसंतीची तब्बल 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते बाद झाली. त्यांच्या विजयामुळे लोकसभा व राज्यसभेचे पीठासीन अधिकारी एकाच राज्यातील (राजस्थान) असल्याचा योगायोग जुळून आला आहे. वर्तमान लोकसभा सभापती ओम बिर्ला हे कोटाचे खासदार असून धनखड यापूर्वी झुनझुनूतून संसदेवर (लोकसभा) निवडून आले होते. 1974 पासून सुरू असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाची यात्रा उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपली. धनकड यांच्या रूपाने आणखी एका ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे.
येत्या 11 ऑगस्ट रोजी (बुधवारी) उपराष्ट्रपती धनखड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर ते राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील.