वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून पूजा खेडकरला तात्काळ अटक करू नये असं न्यायालयानं म्हटलं आहे..
दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकरला तूर्तास दिलासा मिळाला असून पटियाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकरनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यावर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरला तूर्तास अटक करू नये असं दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलेला आहे.. याप्रकरणी आता 21 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे