महिला दिन विशेष ; प्रत्येक भारतीय महिलेला ‘हे’ कायदे माहिती असायलाच हवेत…

304 0

दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन आजच्या जागतिक माहिला दिनानिमित्त जाणून घेऊयात महिलांना ठाऊक हव्या अशा महत्वाच्या कायद्यांबद्दलची ही खास माहिती

1. मोफत कायदेशीर मदत : प्रत्येक महिलेला हे माहितीच असलं पाहिजे की, मोफत कायदेशीर मदत म्हणजेच कायदेशीर सल्लागार (वकिल) मिळवण्याचा तिला अधिकार आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिने अशी मागणी करायलाच हवी.

2. पुरुषाइतकंच वेतन: एकसमान कामासाठी स्त्री किंवा पुरुषांची नोकरभरती करताना कोणत्याही कंपनीला वा मालकाला पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला कमी वेतन देण्याचा भेदभाव करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला पुरुषा इतकंच समान वेतन मिळण्याचा हक्क आहे.

3. लैंगिक छळाविरूद्धचा कायदा : लैंगिक छळ (प्रतिबंधक) कायदा 2033च्या अनुसार, दहापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनेत किंवा कंपनीत ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला कर्मचाऱ्यांची लैंगिक छळाची तक्रार दाखल करुन घेणे, त्या तक्रारींची चौकशी करणे, दंड ठोठावणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे.

4. महिला पोलीस कर्मचारीच महिलेला अटक करु शकतात : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) कलम 46(1) अनुसार, कोणत्याही महिलेला पुरुष पोलीस अधिकारी अटक करु शकत नाही. एखाद्या महिलेला कोणत्याही कारणास्तव अटक करायची असेल तर महिला पोलीस अधिकारी वा कर्मचारीच ते करू शकतात.

5. पालकांच्या संपत्तीत वाटा : हिंदू वारसा (सुधारित) कायदा 2005 अनुसार, मुलाप्रमाणे मुलीलाही तिच्या पालकांच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा अधिकार आहे. पालकांनी जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्यांच्या संपत्तीत मुलाचा आणि मुलीचा वाटा समसमान असेल.

6. स्वत:ची ओळख गुप्त ठेवणे : लैंगिक छळ कायदाच्या कलम 16 अनुसार, ज्या महिलेचा लैंगिक छळ झाला आहे अशा पीडित महिलेला तिच्या नावाबाबत गुप्तता बाळगण्याचा अधिकार आहे.

Share This News

Related Post

TOP NEWS INFO: गुजरातसाठी ‘आप’कडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर ! कोण आहेत इसुदान गढवी ?

Posted by - November 4, 2022 0
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली. आपचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे…

खळबळजनक ! भोसरी एमआयडीसी परिसरातील फ्लॅटमध्ये आढळले ज्येष्ठ दाम्पत्याचे मृतदेह…VIDEO

Posted by - September 21, 2022 0
पिंपरी-चिंचवड : भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गंधर्वनगरीत एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. येथील एका फ्लॅटमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याचे…

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला अपघात; 12 जण जखमी

Posted by - March 19, 2023 0
मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला पुण्यातील बावधान, सीएनजी पेट्रोल पंपानजीक अपघात भीषण अपघात झाला असून या बसमधे एकुण 36…

मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

Posted by - July 18, 2022 0
पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…
Priya Berde

Priya Berde : प्रिया बेर्डें छोट्या पडद्यावर ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक

Posted by - August 4, 2023 0
‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *