सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता व्यंगचित्र कला संग्रहालयही..!

334 0

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या चित्राबरोबरच भारतात इस्ट इंडिया कंपनीची सुरवात आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंत एकूणच सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी अनेक दुर्मिळ व्यंगचित्र पाहण्याची संधी आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज ‘एसके’ श्रीराम यांच्या हस्ते व्यंगचित्रकला संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले.

या उदघाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागाच्या प्रमुख डॉ.माधवी रेड्डी, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुरज ‘एसके’ श्रीराम म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून व्यंगचित्रकला अधिकाधिक कलाप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत हॊईल तसेच पुढील काळात युवा कलाकारांना यातून संशोधनासाठी आणि कला प्रदर्शनासाठी व्यासपीठही उपलब्ध होईल. या कलादालनात केवळ व्यंगचित्र नाही तर व्यंगचित्रकलेविषयी माहिती देणारी अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासासाठी होईल.

व्यंगचित्रकलेचा जवळपास अडीचशे वर्षापासूनच इतिहास या व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे केवळ व्यंगचित्रांचे प्रदर्शन नसून हा एक प्रयोग आम्ही करत आहोत ज्या माध्यमातून भविष्यात या विषयीचे अभ्यासक्रम, संशोधन तसेच प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळेल याचा विचार आम्ही करत आहोत.

डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Share This News

Related Post

Cylinder Blast

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Posted by - November 29, 2023 0
मुंबई : मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आहे. या…
Eknath Shinde Call

Light : कुणी लाईट देता का लाईट? वर्ध्याच्या पठ्ठ्याचा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन…

Posted by - July 13, 2023 0
वर्धा : खेडेगाव म्हंटले कि लोडशेडिंग (Light) आले. सरकार बदलत राहिले पण हा प्रश्न काही अजून सुटला नाही. काल रात्री…

‘दादा, परत या’, कोथरूडमध्ये झळकत आहेत चंद्रकांत पाटील यांचे बॅनर

Posted by - April 7, 2022 0
पुणे – सध्या कोथरूड भागात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे बॅनर आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार…

#CRIME NEWS : पत्नीचे सासऱ्यासोबत होते तसले संबंध ; संतापलेल्या पतीने वडिलांनाच डोक्यात दगड घालून संपवले, असा झाला खुनाचा उलगडा

Posted by - February 11, 2023 0
मिर्जापुर : मिर्जापुरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे सासऱ्यांसोबतच अनैतिक संबंध होते. या गोष्टीवरून घरामध्ये रोज…

पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून पंजाबमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *