मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उपलथापालथं पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या काही आमदारांसह सरकारला पाठिंबा दर्शवला. यानंतर अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. टीकेलाराष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन पवारांनी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
Pune News : पिकनिक पडली महागात ! कुंडमळा धबधब्यावरील ओंकार गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
काय म्हणाले शरद पवार ?
‘ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
Nashik Crime News : नाशिक हादरलं ! मांत्रिक महिलेची भक्तानेच केली हत्या
अजित पवारांना प्रत्युत्तर
मला वयाबद्दल सल्ला दिला जात आहे. पण आताच्या मंत्र्यांमध्ये तटकरे आहे, भुजबळ आहे, अनेकांचं वय हे 70 च्या पुढे आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्यांच्याशी माझा संवाद यायचा, ते अधिक जोमाने काम करायचे ते मोरारजी देसाई होते, ते पंतप्रधान झाले त्यांचं वय 84 होतं, आणि ते दिवसाला किती तास काम करायचे, हे एकदा तपासून पाहा. वय असतं असं नाही, पण चांगली प्रकृती असेल तर वय कधी अडचण ठरत नाही. ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ असं म्हणत पवारांनी अजितदादांना सुनावलं.