संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

329 0

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो.

या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे.

त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो.

त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत.

ते म्हणाले की, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

अशा रितीने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असल्याचं पाटील म्हणाले

Share This News

Related Post

Raigad Sohala

राज्याभिषेक सोहळ्यातुन ‘हा’ नेता तडकाफडकी रायगडावरून निघून गेला; चर्चाना उधाण

Posted by - June 2, 2023 0
पुणे : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj)…
Chandrakant Khaire

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Posted by - February 25, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) उतरवणार असल्याची चर्चा राजकीय…

पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज…
Ajit Pawar And Supriya sule

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार (Supriya Sule) हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये पार पडलेल्या शिबिरात अजित…
Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Posted by - January 1, 2024 0
मुंबई : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Eknath Shinde) होणार आहे. मंदिराच्या उभारणीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *