पुणे : कोंडव्यातील टिळेकरनगर मधील द्वारिकाधाम सोसायटीमध्ये चालू असलेल्या इमारतीच्या साइटवर काम करत असताना एका कामगाराचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी अंत झाला. या घटनेमध्ये मरिअप्पा मल्लय्या वनकेरी (वय वर्षे 30) या कामगाराचा मृत्यू झाला.
साइटवर कामगारांच्या जीवितांची कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याच्या आरोपावरून ठेकेदार मुकुंद रेड्डी आणि बिल्डर राहुल नावंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीचे कामकाज सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. त्याचबरोबर बिल्डिंगच्या बाजूने सुरक्षारक्षक नेट देखील बांधण्यात आलेले नाही. त्यामुळेच या कामगाराचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी साहेबराव मलया रामोशी यांनी फिर्याद दिली असून ठेकेदार आणि बिल्डर यांच्याविरुद्ध कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.