chitra wagh

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

4544 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha) रणधुमाळी सुरू झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या जाहिराती संदर्भात अनेक गंभीर आरोप केले. ठाकरे गटाकडून महिला अत्याचारासंदर्भात प्रसारित केलेल्या जाहिरातीत चक्क पॉर्न स्टारने भूमिका केल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आदुबाळ नाइट लाइफ प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शनच्या जाहिरातीत जे पात्र आहे ते पॉर्नस्टार आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत जाहिरातीत काम केलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवत म्हटलं की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहिरातीत पॉर्न स्टारने काम केलंय. जाहिरातीत जे पात्र आहे ते पॉर्न स्टार आहे. तोच विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, तोच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, हाच पॉर्नस्टार लहान वयाच्या मुलींसोबत चित्रिकरण करतो.

बापाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती , हेच पात्र उल्लू एपवर मुलींसोबत घाणेरडं कृत्य करत असल्याच्या क्लीप्स आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रात पॉप पार्टी आणि पॉप हे ते आणतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कसली संस्कृती आणतायत. असे बाप महाराष्ट्रात, जाहिरातीत दाखवून काय दाखवायचंय असा सवाल चित्रा वाघ यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्र सरकारकडे विनंती आहे की बऱ्याच अश्लील एपवर बंदी घातलीय, आता या अश्लील एपवरही बंदी घालावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज ! शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव…
Atul Save

Atul Save : ओबीसी, एससी, एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी; भाजप मंत्री अतुल सावे यांचे आव्हान

Posted by - May 4, 2024 0
छत्रपती संभाजीनगर :- एससी,एसटी आणि ओबीसींचा आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे…
Jayant Patil

Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 20, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay…

सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ

Posted by - August 19, 2023 0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा…

विधानपरिषद निवडणूक: शेकापच्या जयंत पाटील यांचा दारुण पराभव

Posted by - July 12, 2024 0
विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असुन मतमोजणी देखील संपन्न झाली असून या निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *