Devendra Fadnavis and sharad pawar

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

449 0

सोलापूर : मागच्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या मतदार संघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे माढ्यात भाजपाची ताकत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला आहे. नुकतीच विठ्ठल कारखान्यावर सभासद शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत अभिजित पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील अशी हायहोल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News
error: Content is protected !!