ब्रेकिंग न्यूज ! शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त

477 0

मुंबई- एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोच हा शिवसेनेसाठी दुसरा धक्का बसला आहे.

ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याचे समजते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. मात्र, मध्यंतरी हा तपास थंडावला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.

Share This News

Related Post

देशाचे नवे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचं पुण्याशी खास कनेक्शन

Posted by - November 11, 2022 0
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड…

पुण्यातील धक्कादायक घटना : पोलिस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून केला जीवघेणा हल्ला, वाचा सविस्तर

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये गस्त घालीत असताना एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
Mandhardevi Temple

Mandhardevi Temple : मांढरदेवी मंदिर आज पासून 8 दिवस राहणार बंद

Posted by - September 21, 2023 0
सातारा : साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. वाई तालुक्यातील मांढरदेवी मंदिर (Mandhardevi Temple) आज पासून 28 सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद…

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला अपघात; 12 जण जखमी

Posted by - March 19, 2023 0
मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसला पुण्यातील बावधान, सीएनजी पेट्रोल पंपानजीक अपघात भीषण अपघात झाला असून या बसमधे एकुण 36…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *