Devendra-Fadnavis-Raj-Thackeray-Eknath-Shinde-2

युतीचा फॉर्म्युला ठरला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

475 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमध्ये नेमके काय झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आगामी मुबंई महापालिकेची निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

पुन्हा मनसेसोबत युतीच्या चर्चेला उधाण
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप व शिवसेना शिंदे गट यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अजून निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी युतीमध्ये मनसे (MNS) देखील सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

काल फडणवीस राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मध्यरात्री फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून मनसेसोबतच्या युतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता आगामी निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!