UPI Lite X Feature

UPI Lite X Feature : आता इंटरनेट शिवाय पाठवता येणार ऑनलाइन पैसे; UPI Lite X Feature लाँच

3171 0

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूपच लोकप्रिय आहे. डिजीटल पेमेंटमुळं व्यवहार करणे (UPI Lite X Feature) सध्या सोप्पे झाले आहे. मात्र कधी कधी इंटरनेटची सुविधा नसल्याने युपीआय पेमेंट करण्यात अडचण येते. नागरिकांची हिच अडचण समजून घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने एक नवीन Upi Lite X Feature लाँच केलं आहे. या फिचर्समुळं आता युजर्सला ऑफलाइन मनी ट्रान्सफर करता येणार आहे.

युपीआय लाइट एक्स म्हणजे काय?
शहराच्या बाहेर गेल्यास किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यास ऑनलाइन पेमेंट करणे कठिण होऊन जाते. अशावेळी जवळ कॅश नसेल तर खूप अडचणी निर्माण होतात. मनात असतानाही वस्तू खरेदी करता येत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी युपीआय लाइट एक्स लाँच करण्यात आले आहे. या फीचर्समुळे कनेक्टिव्हिटी नसतानाही पैशांची देवाण-घेवाण करता येते. ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे अशा ठिकाणांसाठी हे खूप फायदेशीर ठरु शकता. अनेकदा फोनमध्ये रिचार्ज नसल्यासही पेमेंट होण्यास प्रोब्लेम येतो. UPI LITE X नियर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) सपोर्टने काम करतं. UPI LITE पेमेंट इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जास्त फास्ट आहे.

UPI आणि UPI लाइट यात काय फरक आहे?
युपीआय लाइट एक पेमेंट सोल्युशन आहे ज्यात छोट्या-मोठ्या देवाणघेवाणीसाठी वापर होऊ शकतो. यात एनपीसीआय कॉमन लायब्रेरी (सीएल) अॅपचा उपयोग करण्यात आला आहे. यात 500 रुपयांपेक्षा कमी पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा एका ऑन डिव्हाइस वॉलेटसारखी आहे. यात युजर्सना युपीआय पिनचा उपयोग करुन पेमेंट करण्याची सुविधा दिली आहे.

युजर्सचा UPI आयडी किंवा लिंक केलेला फोन नंबर वापरून QR कोड स्कॅन करून हे व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. मात्र, UPI Lite Xवरुन पेमेंट करत असताना दोघांकडेही युपीआय लाइट एक्स असणं गरजेचं आहे. UPI व्यवहारादरम्यान, पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातात. पैसे UPI Lite वरून ऑन-डिव्हाइस वॉलेट किंवा UPI Lite खात्यावर पाठवले जातात.युपीआय बँक अकाउंटहून एकादिवसात जास्तीत जास्त 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जातात. तर, युपीआय लाइटवरुन जास्तीत जास्त 500 रुपयेच ट्रान्सफर करता येतात. तर, एका दिवसात फक्त 4 हजारांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात.

Share This News

Related Post

Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल आला समोर; काय म्हंटले अहवालात?

Posted by - July 5, 2023 0
बुलढाणा : समृद्धी महामार्गाचे (Buldhana Bus Accident) 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. गेल्या…

बीड :”नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते…!” – पंकजा मुंडे

Posted by - September 29, 2022 0
बीड : बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे…

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Posted by - December 13, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु…
Ajit pawar Oath

Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते होते ईडीच्या रडारवर; मात्र आता सरकारमध्ये सामील

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये छगन…

चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बस उड…(संपादकीय)

Posted by - September 3, 2022 0
आपल्यापैकी सर्वांनीच बालपणी एक खेळ खेळलाय. गोल रिंगण खालून बसायचं… हात जमिनीवर ठेवायचा आणि त्यातल्या एका बोटाला कुणीतरी एकानं उडण्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *