Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल आला समोर; काय म्हंटले अहवालात?

847 0

बुलढाणा : समृद्धी महामार्गाचे (Buldhana Bus Accident) 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात (Buldhana Bus Accident) या महामार्गावर झालेत. शनिवारी या महामार्गावर झालेल्या बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता या दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने हा अहवाल दिला आहे.

फॉरेन्सिक अहवालात काय म्हंटले ?
अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती
जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे
अपघाताच्या वेळी बसची गती 70 ते 80 किलोमीटर प्रति तास होती
अपघातग्रस्त बसचं समोरचं चाक सुरुवातीला साईन बोर्डला धडकलं
त्यानंतर बस दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला धडकली
ही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला
टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आली
बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन उलटली
बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाला आणि डिझेल टँकवर आदळला
त्यामुळे डिझेल टँकमधलं 350 लिटर डिझेल सर्वत्र सांडलं
डिझेल इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि बसने पेट घेतला.

NCP News : बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा आला समोर अजित पवारांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

बसवर नियम मोडण्याचा विक्रम
5 फेब्रुवारी 2021 पीयुसीचा कालावधी संपल्याने 1200 रुपयांचा दंड
24 ऑगस्ट 2022 – बसचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, अयोग्य लाईटचा वापर करणे यासाठी 4500 रुपयांचा दंड
11 ऑक्टोबर 2022 – बसच्या फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याने 23, 500 रुपये दंड
अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने 500 रुपये दंड
आपात्कालीनद्वार काम करत नसल्याने दोन हजार रुपये
ड्रायव्हर समोरची काच फुटल्याने 500 रुपये दंड
जानेवारी 2023 मध्ये नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याने 500 रुपयांचा दंड
12 जून 2023- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, बसच्या विंडोची काच फुटलेली असणे, बस मध्येच कुठेही थांबवणे

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

या बसच्या नावे गेल्या तीन वर्षात 45 हजारांहून अधिकची चलनं फाडण्यात आली आहेत. जो दंड तीन वर्षात भरला नाही तो दंड बसचे जळून सांगाडे झाल्यावर भरण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाला का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!