Ahmednagar SRDF News

Ahmednagar SRDF News : SRDF पथक बुडतानाचा Live Video आला समोर

470 0

अहमदनगर : नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SRDF पथकाची (Ahmednagar SRDF News) बोट उलटली आणि यामध्ये 3 जवानांनी आपला जीव गमावला. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात SDRF पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले. पाण्यात भोवरा निर्माण होऊन SDRF पथकाची बोट पलटली आणि पाहताक्षणी सहाही जण पाण्यात बुडाले. यातील पाच जवानांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तिघा जवानांनी जीव गमावला तर दोघांचे प्राण वाचले आहे.

काय घडले नेमके?
22 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 वर्षे) आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले (वय 25 वर्षे) हे दोन तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात आले होते. अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता. 23 जानेवारीला सकाळी धुळे येथून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांचं शोधकार्य सुरु झाले.

मात्र शोधकार्य सुरु असताना त्याच ठिकाणी 6 जनांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले. SDRF च्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली. जीवाची बाजी लाऊन SDRF चे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र नियतीसमोर कोणाचाच निभाव लागला नाही. यामध्ये SDRF चे PSI प्रकाश नाना शिंदे, कोन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, DRIVER वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update : कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट

VIDEO Viral : फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राचा माज दाखवणारा Video व्हायरल

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 17, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह…
Satara Crime News

Satara Crime News : आयुष्याला वैतागून केला आयुष्याचा शेवट; 2 दिवसांनी मृतदेह मिळताच घरच्यांनी फोडला हंबरडा

Posted by - August 12, 2023 0
सातारा : सातारा (Satara Crime News) आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून कराड (Satara Crime…
Uddhav Thackeray Nashik Visit

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Posted by - January 22, 2024 0
नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये (Uddhav Thackeray Nashik Visit) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित…

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *