Ketki Chitale

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

1041 0

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येताना दिसत आहेत. दरमयान, या अपघात प्रकरणावर वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाली केतकी चितळे?
केतकी चितळे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे. तसेच केतकीने तिच्या लेट्स टॉक युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाहीये.माझ्यावर तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते. तेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये मी गेले होते, ही केतकी तुच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी तेव्हा विचारले होते, अशी आठवण केतकी हिने सांगत पोलिसांवर टीका केली आहे. आता तिच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘त्या’ रात्री काय घडले होते ?
पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.या अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला अटी व शर्तींवर लगेच जामीन मंजूर केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!