Pune News

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

278 0

पुणे : पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत (Pune Porsche Accident) ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल ‘ब्रह्मा ग्रुप’चा मालक आहे. अपघात झाला त्यावेळेस गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अल्पवयीन असताना मुलाला गाडी चालवण्यास दिल्या प्रकरणी विशाल अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.

आरोपीने दिली धक्कादायक कबुली?
या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने आपला जबाब नोंदवला आहे. वडिलांनीच आपल्याला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं या तरुणाने म्हटलं आहे. “मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही. वाहन चालविण्याचा परवानाही माझ्याकडे नाही. तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. त्यांनीच मला मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे,” असं या अल्पवीयन मुलाने पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

बार आणि हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणामध्ये समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये अल्पवयीन मुलाने हॉटेलमध्ये मद्यपान केल्याचा दावा करणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सदर प्रकरणात हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ‘हॉटेल कोझी’चे मालक प्रल्हाद भुतडा आणि ब्लॅक’चे मालक संदीप सांगळे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Related Post

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

Posted by - April 21, 2023 0
सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार मुंबई दि. २१: मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी…
vinod chavan police

Dharashiv News : पत्नीची हत्या करणाऱ्या ‘या’ सहायक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप; राज्यभर गाजले होते प्रकरण

Posted by - May 9, 2023 0
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण…
attack

पती-पत्नीचे झाले भांडण ; पतीने रिव्हॉल्व्हरमधून झाडलेली गोळी लागली थेट 8 वर्षाच्या चिमुकलीला ; पुण्यातील ‘तो’ बांधकाम व्यवसायिक पोलिसांच्या ताब्यात

Posted by - September 24, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री एक धक्कादाय घटना घडली. पती-पत्नीचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने पत्नीवर…

IMP NEWS : ‘ती’ कंपने भूकंपाची नाही ; लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची GSIला सूचना

Posted by - July 19, 2022 0
पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय…

मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात.

Posted by - March 3, 2022 0
मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात. १ मार्च – जागतिक नागरी संरक्षण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *