मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

256 0

सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मुंबई दि. २१: मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्यात यावे असेही ठरले.

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, तसेच आमदार प्रवीण दरेकर, माजी न्या. एम जी गायकवाड, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, एड विजय थोरात, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ३१०० उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

Share This News

Related Post

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ३५ सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी

Posted by - August 25, 2024 0
पुणे :‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरातील…

ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर

Posted by - May 8, 2022 0
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती केली…

भाजपा प्रवेशापूर्वी हार्दिक पटेलांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 2, 2022 0
पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात…
Pune News

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Posted by - February 18, 2024 0
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती (Shiv Jayanti 2024) सोमवारी साजरी करण्यात येणार आहे. ही…

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या ११ व्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित

Posted by - April 12, 2022 0
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *