Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

356 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच 15 वर्षं फोन करणारे आता मात्र फोन करुन विचारपूस करत आहेत. पण विचारपूस केली तरी भावूक होऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात युवा मिशन 2024 महामेळाव्यात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदा संदर्भात मोठे वक्तव्य केले.

काय म्हणाले अजित पवार?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2004 ला आली. मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याच्या खोलात मी जात नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ तेव्हा होते, मला त्यावेळी अपेक्षाही नव्हती. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. पण जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु. संघटना नाही तिथपर्यंत पोहोचवू,” असं अजित पवार म्हणाले.

या महामेळाव्यात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार बोलून दाखवला. तरुण पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यास सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Job News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात नोकरीची संधी; ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासून गर्दी, कसा करावा उपवास, पुजाविधी, गुळ आणि तिळाच्या लाडूचे विशेष महत्व

Posted by - January 10, 2023 0
पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. आज…
Eknath Shinde

बनावट ‘CMO अधिकाऱ्या’चा शिक्षण संस्थांना गंडा; मुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायचा प्रवेश

Posted by - May 25, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांच्या नावाने आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या आरोपीला…

एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *