पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC Recruitment 2024) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती होत आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून उमेदवाराची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत या मुलाखती सुरू राहणार आहेत.
कोणत्या पदांसाठी होतेय भरती?
कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोग प्राध्यापक व प्राध्यापक या पदांसाठी भरती होत आहे.
पदासाठीची वयोमर्यादा
वर दिलेल्या सर्व पदांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त 55 वर्ष पर्यंत दिलेली आहे वेगवेगळ्या पदांसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी जाहिरातीमध्ये रकाना क्रमांक तीन मध्ये वयोमर्यादा दाखवलेली आहे.
‘या’ पदासाठीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेतन किती मिळणार
या पदभरती मध्ये 64,551 रुपये ते 125000 रुपयापर्यंत ठोक मानधन उमेदवाराला देण्यात येणार आहे, उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून त्यामध्ये वेगवेगळ्या गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व आवश्यक त्या कागदपत्रासह भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ येथे सादर करावा. मुलाखतीसाठी ठरलेल्या दिनांकास 02 तास अगोदर हजर राहणे आवश्यक असेल, मुलाखतीला येताना आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्राच्या एक झेरॉक्स आणि मूळ प्रति सोबत ठेवाव्यात.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार