मुंबई : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत (Job News) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात. राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कुठे पाठवायचा अर्ज?
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज भरताना त्यात काही चुकीची माहिती जाणार नाही, याची काळजी घ्या. तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची माहिती खोटी आढळल्यास तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते, हे लक्षात असू द्या. उमेदवारांनी आपले अर्ज पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तिसरा मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, बी.जे. रोड, पुणे-01 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तसेच उमेदवारांना dirmktms@gmail.com या ई-मेलवर आपला अर्ज पाठवता येणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक
PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?
Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार