Dhananjay Munde

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं नाव अन् चिन्ह मिळताच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

389 0

पुणे : आज पुण्यात राष्ट्रवादीचा युवक मेळावा पार पडत आहे, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.

‘ही’ जबाबदारी देण्यात आली
राष्ट्रवादीच्या लोकसभा प्रचार प्रमुखपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आज सुनील तटकरे यांनी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2 जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. त्यानंतर 5 जुलैच्या सभेला खऱ्या अर्थाने लोकशाही दिसली. ती लोकशाही आज ही इथे आहे. 6 फेब्रुवारीला त्या लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्ह ही आपलं झालं. आता इथून पुढं फक्त अजित पर्व असणार. पुढची 50 वर्षे ही दादांचीच आहेत. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

शरद पवार गटाला दिला इशारा
त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला इशारा देखील दिला आहे. अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलात तर आम्हीही सोडणार नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. अजितदादांनी आम्हाला उभं केलं, त्यांच्यामुळंच आम्ही आमदार झालो. आत्ता सर्व पक्षाचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे दादांनीच निवडून आणल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलं आहे. 2024 साली आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचं आहे असे ते यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Job News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात नोकरीची संधी; ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा, ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी

Posted by - March 2, 2023 0
नाशिक : शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत.…

‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन

Posted by - September 14, 2022 0
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर…

ब्रेकिंग न्यूज ! आता नवाब मलिकांच्या घरावर ईडी धडकली ! पहाटेच ईडी अधिकाऱ्यांची कारवाई

Posted by - February 23, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. मलिक…

पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

Posted by - February 10, 2022 0
पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *