नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, सात प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालेगाव – चाळीसगाव मार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेत रिक्षाचा चुराडा झाला आहे.
काय घडले नेमके?
मालेगावच्या दहिवळ जवळ चाळीसगाव मार्गावर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये रिक्षामधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघातग्रस्त रिक्षा मजुरांना घेऊन घरी परतत असताना हा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. तर अपघातानंतर कार खड्ड्यात पलटी झाली. कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट
Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग
Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू