पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून देशातील अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील शिरूर मावळ पुणे आणि बारामती या मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष आहे या मतदारसंघांमध्ये नेमकी मतदार संख्या किती आहे माहित आहे का? जिल्हा प्रशासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 82 लाख 92 हजार 951 इतकी आहे. कोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय किती मतदार संख्या आहे पाहूयात…
पुणे लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदारसंख्या 20 लाख 47 हजार 389
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ: 4 लाख 63 हजार 671
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ: 2 लाख 76 हजार 920
कोथरूड विधानसभा मतदारसंघ: 4 लाख 10 हजार 634
पर्वती विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 39 हजार 375
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 2 लाख 80 हजार 400
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 2 लाख 76 हजार 389
बारामती लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदारसंख्या: 23लाख 62 हजार 407
बारामती विधानसभा मतदारसंघ: तीन लाख 67 हजार 876
इंदापूर विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 23 हजार 74
पुरंदर विधानसभा मतदारसंघ: 4 लाख 27 हजार 218
दौंड विधानसभा मतदारसंघ: 33982
भोर विधानसभा मतदारसंघ: 4 लाख 6 हजार 105
खडकवासला विधानसभा मतदारसंघ: 5 लाख 34 हजार 132
शिरुर लोकसभा मतदारसंघ
एकूण मटदरसंख्या: 25 लाख 27 हजार 241
जुन्नर विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 11 हजार 564
आंबेगाव – 3 लाख 01 हजार 162
खेड-3 लाख 51 हजार 397
शिरुर- 4 लाख 36 हजार 876
भोसरी – 5 लाख 48 हजार 612
हडपसर-5 लाख 77 हजार 630
मावळ लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदरसंख्या: 25 लाख 09 हजार 461
मावळ विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 72 हजार 730
चिंचवड विधानसभा मतदारसंघ: 6 लाख 12 हजार 880
पिंपरी विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 70 हजार 304
पनवेल विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 70 हजार 942
उरण विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 92 हजार 275
कर्जत विधानसभा मतदारसंघ: 3 लाख 4 हजार 523
पुणे जिल्ह्यातील पुरुष मतदारांची संख्या 43 लाख 28 हजार 954 तर महिला मतदारांची संख्या 39 लाख 43 हजार 969 इतकी आहे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात 728 इतके तृतीयपंथी मतदार आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट
Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग
Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू