पुण्यात ट्रॅफिक जॅम ! अपघातामुळे नाही तर प्रेमी युगुलाच्या रोमान्समुळे, पहा व्हिडिओ

14528 0

प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे आहे म्हणतात. पण हेच प्रेम ज्यावेळी सार्वजनिक होऊ लागते त्यावेळी त्याचे हसे होते किंवा इतरांच्या संतापाला कारणीभूत ठरते. बागेमध्ये, पर्यटनस्थळी, कुठेतरी खोपच्यात एकमेकाला खेटून प्रेमी युगुल गुलुगुलु बोलत बसलेले आपण पाहतो. पण भररस्त्यात जर सगळी वाहतूक थांबवून एखादे युगुल रोमान्स करत असेल तर त्याला काय म्हणावे ? सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अशी असांस्कृतिक घटना घडली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत ?

या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक जोडपे एकमेकांना मिठी मारून उभे असलेले दिसत आहे. वाहतूकही ठप्प झाली आहे. वाहतूक पोलिस या दोघांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक आपल्या गाड्यांमधून उतरुन त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे जोडपे जगाचे भान विसरून एकमेकांना आलिंगन देऊन उभे आहेत. आता हे रोमँटिक दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कुणी टिपलं नाही तरच नवल !

रोमान्स करून झाल्यानंतर दोघेही जणूकाही झालेच नाही अशा अविर्भावात तिथून निघून गेले. वास्तविक या जोडप्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी कारवाई होण्याची गरज होती. मात्र तसे काही झाले नाही. एकूणच या दृश्यामुळे पुणेकर संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाने पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याची ओळख आता पुसण्याचा विडा तरुण पिढीने उचलला आहे की काय असा प्रश्न पडतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!