Nandurbar Accident

Nandurbar Accident : बस- कारचा भीषण अपघात ! 4 जण जखमी

463 0

नंदुरबार : राज्यात अपघाताचे (Nandurbar Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. राज्य परिवहन महामंडळाची बस व कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नंदुरबार- विसरवाडी रस्त्यावर झाला.

काय घडले नेमके?
नंदुरबार- विसरवाडी रस्त्यावरील वडदा गावाच्या शिवारात असलेल्या वळण रस्त्यावर कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अमळनेरहून सुरतच्या दिशेने जाणारी कार भरघाव येत असताना वडदा गावाच्या शिवारात वळणावर कार व समोरून येणारी गुजरात आगाराची बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

4 जण जखमी
या अपघातात कारमधील चालक रवींद्र रमेश जाधव, पत्नी शैला रवींद्र जाधव, मुलगा भाग्य रवींद्र जाधव, भाची मानसी राजेंद्र पाटील (सर्व रा. गायत्रीनगर, नवागाम, सुरत) गंभीर जखमी झाले तर जिग्निशा रवींद्र जाधव या बालिकेचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nanded Loksabha : नांदेडमधल्या मतदानाला लागलं गालबोट; तरुणाने थेट कुऱ्हाडीने EVM फोडलं

Aba Kamble Case : अखेर ! आबा कांबळे खून प्रकरणाचा निकाल लागला; 7 जणांना झाली जन्मठेप

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

Accident News : वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात; 13 जण जखमी

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; सुनील प्रभूंकडून कोर्टात याचिका दाखल

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे रविवारी राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics)…

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय-नाशिक’च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  उद्घाटन

Posted by - April 24, 2022 0
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक नवीन प्रशासकीय इमारत, वसतीगृह, भोजनालय संकूलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी…
Dagdusheth Ganpati

गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

Posted by - May 23, 2023 0
पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati) मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान…
Pune News

Pune News : गुन्हे शाखेकडून ससून हॉस्पिटलच्या गेटवर 2 कोटींचे ड्रग्स जप्त

Posted by - October 1, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेकडून ससून हॉस्पिटलच्या गेटवर मोठी कारवाई…

नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार ? राणा यांच्या घरावर देखील कारवाई होणार ? नेमके काय होणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर मीडियासमोर न बोलण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *