पुणे : पुण्यामधून (Pune News) नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेकडून ससून हॉस्पिटलच्या गेटवर मोठी कारवाई केली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये 1 किलो 75 ग्रॅम MD जप्त करण्यात आली आहे. या ड्रग्सची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.
या सगळ्या प्रकरणात हाय प्रोफाईल आरोपी ललित पटेल आणि त्याचे दोन साथीदार यांचा समावेश असल्याचे समजत आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.
ललित पटेलला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का? याचा तपासदेखील पोलीस करत आहेत.