राज्यात ‘या’ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

461 0

दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने सोमवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, हिमालाय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होईल. त्याचवेळी विजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र
आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

जोरदार पडणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो. तसेच देशातील आसाम आणि मेघालय राज्यात पावसासह गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!