प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

400 0

नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस या योजनेसाठी महत्त्वाची आहे पंचायत सचिव पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटर द्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे

* सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
* आता Farmers Corner वर जा.
* येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
* यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
* या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
* यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो.

Share This News

Related Post

‘तुमच्या पक्षनेतृत्वाने राष्ट्रवादीच्या गाडीला लावून आपलं टायर फोडून घेतलंय’ मनसेला स्टेपनी म्हणणाऱ्या अंधारेंचा मनसेने घेतला समाचार

Posted by - November 22, 2022 0
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. या…
Nagpur News

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 28, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सीताबर्डीच्या तेलीपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिला जिम ट्रेनरने गळफास…

गर्जा महाराष्ट्र माझा! 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन ?

Posted by - May 1, 2023 0
आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा…
Mumbai Pune Highway

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Posted by - January 24, 2024 0
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. ही…
RASHIBHAVISHY

#DailyHoroscop : कन्या राशीच्या लोकांनी आज कोणाची टीका करण्यात वेळ वाया घालवू नका; वाचा तुमचे राशी भविष्य

Posted by - January 20, 2023 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. गृहिणींनी स्वयंपाक घरात काम करताना दक्षता घ्या.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *