आलीय भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

205 0

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड मिलियनहून अधिक व्युव्ह मिळाले आहेत.

संजय लीला भन्साळी यानी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटावरून वादही निर्माण झाला होता. गंगूबाईंच्या कुटुंबातील काही लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. संजय लिला भन्साळी यांचा चित्रपट आणि त्यावरून होणारा वाद याला मोठा इतिहास आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. याआधीही पद्मावत हा त्यांचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर कलाकारांना कोरोना झाला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यास प्रचंड वेळ लागला होता. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’च्या ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना आलियाचा लुक आवडलाय तर काहींनी तिच्या अभिनयाची तारिफ केलीये. “आलियाने उत्तम काम केलंय,” असं एकाने म्हटलंय तर “आलियाला याआधी रोमॅन्टिक सीन करताना पाहिलं आहे. आता तिने ही बोल्ड भूमिकाही उत्तम प्रकारे साकारली आहे”, असं दुसऱ्याने म्हटलंय.

Share This News

Related Post

Kuljit Pal

Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक देणाऱे निर्माते काळाच्या पडद्याआड

Posted by - June 25, 2023 0
मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन (Kuljit…
Shreyas Talpade

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Posted by - December 15, 2023 0
मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रात्री तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले…

अभिनेत्री स्पृहा जोशी साकारणार ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Posted by - June 7, 2022 0
अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या अभिनयासाठी तसेच कविता, सूत्रसंचालन आणि लेखनासाठी प्रसिद्ध आहे आणि प्रेक्षकांच्या चर्चेत ही असते. आता ती एका…
Neem Leaves

Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल

Posted by - July 9, 2023 0
आजकालच्या वाढत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या आरोग्याच्या (Health) समस्या वाढताना दिसत आहेत. लोकांना पित्त, शुगर आणि बरेच आजार उद्भवतात. त्यातल्या त्यात शुगरचा…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *