ब्रेकिंग न्यूज ! आता नवाब मलिकांच्या घरावर ईडी धडकली ! पहाटेच ईडी अधिकाऱ्यांची कारवाई

399 0

मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. मलिक यांच्या घरावर ईडीनं आज पहाटे धाड टाकली असून एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप मधील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. त्यानंतर मलिक यांना ईडीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे.

इकबाल कासकर, इकबास मिरची, आणि अस्लम फ्रूट यांना ईडीनं ताब्यात घेतलं होतं. इकबाल कासकरनं ईडी चौकशीत मलिक यांचं नाव घेतल्याचं बोललं जातंय. त्यानंतर ईडीनं कारवाई करत मलिकांची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. दरम्यान, नवाब मलिकांनी 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदीचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

फडणवीस यांनी काय आरोप केले ?

– 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
– कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
– 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
– मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
– 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
– जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.

Share This News

Related Post

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई झोनमध्ये योग दिवस साजरा

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- जागतिक योगदिनानिमित्त पंजाब नॅशनल बँक, प्रगती टावर्स, कुर्ला बांद्रा कॉम्पलेक्स येथे सकाळी झोनल मॅनेजर बी.पी.महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरातील…

शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

Posted by - February 19, 2023 0
पुणे: शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे. लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण…

CM ARVIND KEJARIWAL : “फक्त गुजरातची सत्ता ताब्यात द्या.. 300 युनिट वीज मोफत देतो …!”

Posted by - July 22, 2022 0
सुरत : आम आदमी पक्षाचे (एपीपी) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आश्वासन दिले की, त्यांचा पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास दरमहा…

ऐन दिवाळी ST प्रवाशांचं निघणार दिवाळं! 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान STची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

Posted by - October 15, 2022 0
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *