Stamp Paper

Stamp Paper : 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द

1068 0

मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार आहेत. न्यायिक स्टॅम्प पेपर आणि गैरन्यायिक स्टॅम्प पेपर. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. ते अधिकृत मुद्रांक विक्रेते किंवा सरकार मान्यताप्राप्त बँकांमध्ये मिळतात. स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क भरले जाते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहाराच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार योग्य स्टॅम्प पेपर वापरला जातो. अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रांक व शुल्क नोंदणी विभागाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

सध्या फक्त 10 हजार रुपयांचा स्टॅम्प पेपर बँकेतून फ्रॅकिंग करून दिला जात आहे. यापूर्वी मिळणारे पाच व दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर 2015-16 च्या दरम्यान बंद करत फक्त 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारात ठेवले आहेत. आता या किमतीचे स्टॅम्प पेपर व्यवहारातून रद्द करून थेट राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून देण्याचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र यासह पाच राष्ट्रीय बँकांबरोबरच तालुकापातळीवरही स्टॅम्प पेपर फ्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

Posted by - March 25, 2023 0
पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात…
School

Teacher Recruitment : ZP शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता कायमच्या बंद; ‘पवित्र’द्वारे होणार भरती

Posted by - September 5, 2023 0
सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील 23 हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील 8 ते 10 हजार शिक्षकांची…
ST-Bus

ST Bus : प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचं लोकेशन करता येणार ट्रॅक

Posted by - July 17, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हजारो प्रवासी एसटी बसनं (ST Bus) प्रवास करतात.…
drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या…

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022 0
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *