आता टोइंग चार्ज ची चिंता नाही; नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांनी दिल्या नव्या सूचना

3503 0

पुण्यात पार्किंगचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेक वेळा पार्किंग ची सोय नसल्यामुळे नो पार्किंग मध्ये वाहन चालकांकडून वाहने लावली जातात. ही वाहने टोइंग केली जातात. ज्याचा अतिरिक्त दंड भरावा लागतो. यासाठीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबत त्यांनी ‘टोइंग’ करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी परिपत्रक जारी केले आहे.

नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन वापरली जाते. हे काम खाजगी कंपन्यांना देण्यात आलेले आहे. अनेक वेळा गाड्या ओढून नेणारे हे कर्मचारी वाहन चालकांशी वाद घालतात. गाडीचा मालक गाडीच्या जवळ असला तरीही अनेकदा गाड्या ओढून नेल्या जातात. अशा तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळेच टोइंग करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस आयुक्तांनी बैठक घेतली.

 

या बैठकीत वाहने नो पार्किंग मध्ये पार्क केलेली असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असल्यास वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये गाडी टोइंग करण्याचा दंड ही आकारला जातो. त्यामुळेच गाडी टोइंग करताना जर गाडीचा मालक त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर टोइंग चार्ज घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यात पार्किंगची समस्या गंभीर आहे. अनेक जण इतर शहरातून पुण्यात आलेले असतात. पार्किंग बद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते. अनेकदा सम विषम तारखेला कुठे पार्किंग असते, याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहने ओढून नेण्याच्या आधी कर्मचाऱ्यांकडून ध्वनीक्षेपकाद्वारे घोषणा केली जावी, त्यानंतर अशा प्रकारची कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

Share This News

Related Post

chagan Bujbal

महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ घटनेवर छगन भुजबळ नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Posted by - May 29, 2023 0
नाशिक : रविवारी महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आणि सावित्रीबाई…

राष्ट्रवादी कुणाची; केंद्रीय निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं

Posted by - October 6, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी तब्बल दोन तासांनी संपली आहे. शरद पवार आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.…

टीईटी परीक्षा घोटाळा; अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास

Posted by - January 28, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे…

जुन्नरमध्ये व्यावसायिकाची हत्या ! मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला

Posted by - April 8, 2023 0
व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *