Google

Google Apps : गुगलकडून डिलीट करण्यात आले ‘हे’ 17 अ‍ॅप

384 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलकडून (Google Apps) नेहमीच कठोर पावलं उचलली जातात. याच पार्श्वभूमीवर गुगलने 17 Spy Loan Apps डिलीट केले आहेत. यासंदर्भात सॉफ्टवेअर कंपनी ESET ने अलीकडेच याबाबत एक नवीन रिपोर्ट जारी केला आहे. यात म्हटलं आहे की, 17 अ‍ॅप्स हे SpyLoan अ‍ॅप्स म्हणून कार्यरत होते. गुगलकडून डिलीट करण्यात आलेले अ‍ॅप्स हे धोकादायक आहेत.

या अ‍ॅप्समधून युजर्सचा डेटा विनापरवानगी चोरी करण्यात येत होता. तुमच्या फोनमध्ये देखील हे अ‍ॅप असेल तर आजच हे अ‍ॅप्स डिलीट करा. या अ‍ॅप्सचा माध्यमातून कर्ज घेणाऱ्या युजर्सना ब्लॅकमेल केले जात होते. तसंच फोनमधून डेटा चोरुन या युजर्सना कर्जाचे रिपेमेंट करण्यासाठी धमकी दिली जात होती. त्याचबरोबर युजर्सकडून जास्त व्याजाची रक्कमही वसुल करत होते. हे लोक अफ्रीका, लॅटीन अमेरिका आणि साउथ ईस्ट एशियासारख्या युजर्सना टार्गेट करत आहेत.

‘हे’ अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरमधून रिमूव्ह
AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash

तुमच्या फोनमध्ये यापैकी काही अ‍ॅप्स असतील तर ते तातडीने डिलीट करा. अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!