शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी गणेश बबन जगदाळे याच्यासह त्याचे साथिदार गौरव वसंत बुगे, शुभम प्रकाश रोकडे , रोहित विजय अवचरे , रोहन राजु लोंढे ,
सौरभ दत्तु सरवदे , आकाश सुरजनाथ सहाणी , ऋषिकेश विठ्ठल साळुंखे , अनिस फारुख सय्यद , आकाश सुरेश शिळीमपुर , बाब्या उर्फ आदित्य संजय नलावडे, अजय कालिदास आखाडे, कुणाल रवि गायकवाड यांच्यावर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 74 आणि चालु वर्षात 11 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख गणेश बबन जगदाळे (वय-26 रा. सुखसागर नगर भाग 2, कात्रज मुळ रा. खासगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद याच्यासह त्याचे साथिदार गौरव वसंत बुगे (वय-20 रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे मुळ रा. बुगेवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर, शुभम प्रकाश रोकडे (वय-25 रा. शाहु वसाहत, पर्वती, पुणे), रोहित विजय अवचरे (वय-24 रा. लक्ष्मीनगर-, गजानन महाराज मठासमोर, पर्वती), रोहन राजु लोंढे (वय-23 रा. शाहु वसाहत पर्वती, पुणे),
सौरभ दत्तु सरवदे (वय-22 रा. राम मंदिराजवळ, पर्वती, पुणे), आकाश सुरजनाथ सहाणी (वय-24 रा. जनता वसाहत दत्तवाडी-), ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (वय-21 रा. तिरंगा मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, दत्तवाडी), अनिस फारुख सय्यद (वय-19 रा. गल्ली नं.77 जनता वसाहत दत्तवाडी), आकाश सुरेश शिळीमपुर (वय-21 रा. राममंदिर, जनता वसहात दत्तवाडी), बाब्या उर्फ आदित्य संजय नलावडे (वय-20 रा. पर्वती पायथा, पुणे), अजय कालिदास आखाडे (वय-22 रा. बनकर वस्ती, ऋतुनगरी शेजारी, धायरीगाव), कुणाल रवि गायकवाड (वय-21 रा. धायरेश्वर मंदिराजवळ, शिवांजली मित्र मंडळाजवळ, वडगाव धायरी यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.