राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याची भूमिका जाहीर केली. यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली असून खुद्द मनसेमध्येच पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवून थेट शिवसेनेलाच डिवचलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.