कोल्हापूर पोटनिवडणुकीत पैसे वाटप होत असल्याबाबत आरोप-प्रत्यारोप

501 0

कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. याठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं भाजपवर केला आहे तर भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्यचा आरोप केला आहे. एकूणच या निवडणुकीत राजकारण तापले आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान करण्यात येत आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना प्रलोभनं दिल्याचा आरोप केला जात आहे. काल (सोमवारी) भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं सापडली. मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्यांकडे मतदार यादी आणि पैशांची पाकिटं सापडल्याची माहिती मिळतं आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयावर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

कोल्हापूरच्या शाहुपुरी भागांत काल रात्री उशीरा पैसे वाटणाऱ्यांना माजी महापौर सुनील कदम यांनी पकडलं होतं. हे कार्यकर्ते सतेज पाटील यांचे असल्याचा सुनील कदम यांचा आरोप आहे.

अशातच आता भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्यचा आरोप केला आहे. त्यामुळे कोल्हापूर निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.

Share This News

Related Post

लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखाचा निधी

Posted by - September 15, 2022 0
पुणे : लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून…

भूमिहीनांच्या डोक्यावर टांगती तलवार आणि गायरानात मंत्र्यांची चराई! दुर्बल अतिक्रमातांना मात्र नोटिसा हा निर्लज्जपणाच – आप

Posted by - December 27, 2022 0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारे आणि २०२२मधील हायकोर्टाच्या आदेशानुसार मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने गायरानांवरील सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर…

PUNE : केंद्र सरकारच्या 5% GST संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद यशस्वी

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या अंतर्गत व्यापारी वर्गाने पुकारलेला बंद यशस्वी रीत्या शांततेत शांततेत पार पडला. कोणताही अनुचित…
Weather Forecast

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - January 2, 2024 0
देशासह राज्यात थंडीची वाट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा अवकाळीचा धोका (Weather Update) असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे राज्यावर…

पोलीस खात्यात सामील व्हायचंय ? पोलीस भरती सुरु होणार ! तयारीला लागा

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये सामील होण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *