Punit Balan

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

557 0

दुबई : वृत्तसंस्था – पुनित बालन ग्रुप (Punit Balan) ईगल्सने वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे रविवारी रात्री रंगलेल्या अंतिम फेरीत त्यांनी टीम काइट्सचा 29-26 असा पराभव केला. अमेरिकन ओपन विजेता डॅनिल मेदवेदेव आणि 2023 ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळलेला आंद्रे रुब्लेव्ह आणि सोफिया केनिन त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

पुनित बालन ग्रुप ईगल्सने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना वर्ल्ड टेनिस लीगच्या ट्रॉफीवर  नाव कोरले. मात्र, त्यांना मिश्र दुहेरीची सुरुवातीची लढत गमवावी लागली होती.  मेदवेदेव-मिरा अँड्रीवा जोडीला टायब्रेकरमध्ये पॉला बडोसा-स्टेफानोस त्सित्सिपास 6-7 (5-7) असे पराभूत केले. अपयशी सुरुवातीनंतर महिला आणि पुरुष दुहेरी तसेच पुरुष आणि महिला एकेरीत बाजी मारली. महिला दुहेरीत अँड्रिवा आणि सोफिया केनिन यांनी बॅडोसा आणि अरिना सबालेन्का यांनी जोडीला चुरशीच्या लढतीत 7-5 असे रोखले.

माझ्यासाठी ही पहिलीच वर्ल्ड टेनिस लीग होती. त्यात थेट विजयाने सुरुवात झाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्या वैयक्तिक कामगिरीसह सांघिक कामगिरीबद्दलही आनंदी आहे. पुरुष दुहेरीतील विजयाने खूश आहे. विशेषत: सोफियासोबत खेळलेल्या पहिल्या सामन्यात आम्ही हरलो होतो. सामन्यात पुनरागमन करण्यादृष्टीने आम्हाला विजय आवश्यक होता. त्यात कामगिरी उंचावण्यात यश आलो. आम्ही गमावलेली एकमेव दुहेरी मिश्र दुहेरी होती. पण ठीक आहे, टेनिसमध्ये असे होऊ शकते, असे जागतिक क्रमवारीत तिसर्‍या ष्थानी असलेल्या मेदवेदेव यांनी सांगितले.

पुरुष दुहेरीत मेदवेदेव आणि रुब्लेव्ह यांनी ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि लॉयड हॅरिसविरुद्ध 6-3 असा सहज विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला रुब्लेव्ह हा त्याच्या योगदानामुळे आनंदी होता. पोडियम फिनिशसाठी योगदान देता आल्याने तोही खूश आहे.

आजचे महान टेनिसपटू पीबीजी ईगल्सचा भाग असणे हा एक अप्रतिम अनुभव होता. त्यातच विजयासह अव्वल स्थान हीच आम्हा सर्वांची अपेक्षा होती. आमच्या संघाने ज्याप्रमाणे जिद्दीने खेळ केला. काही वेळा पिछाडीवरून पुनरागमन केले. तसेच क्लिनिकल फिनिश केली, हे सर्व आनंददायी आहे. चॅम्पियन म्हणून आम्ही 2023 वर्षाला निरोप दिला. त्यामुळे ईयर एंडिंगचा आनंद साजरा करण्याचे चांगले कारण मिळाले, अशी टिप्पणी पुनित बालनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी केली.

पीबीजी ईगल्सकडून महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या केनिनने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी साबालेन्का हिला पराभूत करून एका सर्वोत्तम विजयाची नोंद केली. सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला पुरुष एकेरी लढतीत शानदार विजयाची आवश्यकता होती. त्यात ग्रिगोर दिमित्रोव्हने रुब्लेव्हवर 6-3 असा विजय मिळवला असला तरी 29-26 अशा फरकाने विजेतेपद मिळविण्यासाठी पीबीजी ईगल्सकडे पुरेसे गुण होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Share This News

Related Post

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022 0
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील…

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Posted by - May 10, 2022 0
पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात…

समज गैरसमज : सिंगल युज प्लास्टीक बंदी कारवाई संदर्भात पुणे मनपा अधीकारी आणि व्यापारी प्रतिनिधींची बैठक संपन्न

Posted by - August 5, 2022 0
पुणे : आज सिंगल युज प्लास्टीक बंदी कारवाई संदर्भात समज गैरसमज या विषयावर पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुनाल खैमनार यांच्या…

OBC Political Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे-फडणवीस यांचे अभिनंदन -जगदिश मुळीक

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा – शिवसेना सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले आहे. ओबीसी…
Chappal

चप्पल चोरली म्हणून पट्ठ्याने चक्क 3 जणांविरोधात दाखल केली तक्रार

Posted by - May 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा (theft) गुन्हा (Crime)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *