पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसतानाही काम सुरु असल्याचे सांगून महाशिवरात्रीच्या दिवशी पवळे चौकात सर्वांनी एकत्र येऊन महाआरती केली तसेच याबाबत दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध समाजमाध्यमांवर सुनियोजितरित्या कट रचून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ होणारे मजकूर असलेले संदेश , व्हिडिओ व निमंत्रण पत्रिका या सोशल मीडियावर प्रसारीत करून सर्व हिंदुधर्मीय लोकांना आवाहन केले. त्यांना पवळे चौकात एकत्र जमवले. तेथे महाआरती केली तसेच पोलीस सहआयुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच कार्यक्रमस्थळी वाटप केलेल्या पुस्तिकेमध्ये येथील विवादित ठिकाणी न्यायालयाची स्थगिती असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नसताना तेथे काम चालू असल्याबाबत दिशाभूल व दोन समाजामध्ये तेढ, द्वेष निर्माण व्हावा, या उद्देशाने मजकूर छापलेला आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सुनील सदाशिव तांबट ( वय ५३ , रा . कसबा पेठ ), स्वप्नील अरुण नाईक ( वय ३६ रा . गुरुवार पेठ ), मुकुंद मारुतीराव पाटोळे ( वय ६२ , रा . मंगळवार पेठ ), मिलिंद रमाकांत एकबोटे ( वय ६५ , रा . रेव्हेन्यू कॉलनी , शिवाजीनगर ) , नंदकिशोर रमाकांत एकबोटे ( वय ६० , रा . रेव्हेन्यू कॉलनी , शिवाजीनगर ) , योगेश भालचंद्र वाडेकर ( वय ४१ , रा . शुक्रवार पेठ ) , कुणाल सोमेश्वर कांबळे ( वय ३ ९ , रा . नवी सांगवी ) , रवींद्र राजेंद्र ननावरे ( वय ३३ , रा . पर्वती दर्शन ) संतोष कमलाकर अनगोळकर ( वय ४४ , रा . धनकवडी ) , धारुदत्त वसंत शिंदे ( वय ५२ , रा . सहकारनगर ) , धनंजय मारुती गायकवाड ( वय ५१ , रा . सदाशिव पेठ ) , प्रशांत प्रकाश कांबळे ( वय २४ , रा . मंगळवार पेठ ) , देवीसिंग मोहनसिंग दशाना ( वय १८ , रा . कसबा पेठ ) , विकी रमेश चव्हाण ( वय २५ , रा . कसबा पेठ ) , आदित्य ज्ञानेश्वर कांबळे ( वय १८ , रा . कसबा पेठ ) , विश्वजीत ज्ञानदेव भिसे ( वय २३ रा हमालनगर , मार्केटयार्ड ) , आकाश प्रभाकर माने ( वय १ ९ रा . चव्हाणनगर , पद्मावती ) , पार्थ जय प्रकाश पांचाळ ( वय २१ , रा . नन्हे ) , आदित्य संतोष राजपूत ( वय १८ , रा . पद्मावती ) आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे व नंदकिशोर एकबोटे, वैभव वाघ वगळता इतरांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.