लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे हिवाळा सुरु झाला असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे. या धुक्याचा फटका (Accident News) अनेक गाडयांना होताना दिसत आहे. या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे 240 वर घडली आहे. 6 वाहने एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले.
हाती आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी लखनऊ आग्रा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. सहा गाड्या एकमेकांना धडकल्या. यात तीन बस, एक ट्रक आणि दोन कारचा समावेश होता. बांगरमऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसिरापूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने लखनऊकडून आग्र्याच्या दिशेने निघाली होती. यात पुढे जाणारी डबल डेकर बस अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 12 हून जास्त प्रवासी जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा
Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात
Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन
Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील
Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे