Pune News

Pune News : नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार; ‘पुनीतदादा बालन मित्र मंडळाने केले आयोजन

249 0

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune News) नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा ‘गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. ‘पुनीत दादा बालन मित्र मंडळा’च्या पुढाकारातून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विजयानंतर हा पहिलाच जाहीर सत्कार होता.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुणे लोकसभेची जागा जिंकून दिमाखात संसदेत पाऊल ठेवले. त्यांच्या या विजयात सर्वच घटकांचे महत्वाचे योगदान असले तरी गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी दिलेला जाहिर पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न मोलाचे आहेत. त्यामुळे मोहोळ यांच्या विजयानंतरचा त्यांच्या पहिल्याच जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन कसबा गणपती येथे ‘पुनीत दादा बालन मित्र परिवार’ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात जेसीबीतून गुलालाची उधळण करीत मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर मोठा पुष्पहार घालून मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना खासदार मोहोळ म्हणाले की, ‘‘पुनीत दादा बालन यांनी गणेश मंडळ, नवरात्र मंडळ आणि ढोल ताशा पथक यांना एकत्र करून मला जाहीर पाठिंबा दिला. यामुळेच कसबा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. मी देखील गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आहे. याचा मला कायम अभिमान आहे.’’

‘‘गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी मुरलीधर मोहोळ यांना भरभरून मतदान केले. मंडळाचा कार्यकर्ता खासदार व्हावा ही प्रत्येकाची इच्छा होती. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांनी आणि बाप्पाच्या आशिर्वादाने ही इच्छा पूर्ण झाली. आता आपला प्रतिनिधी दिल्लीत जाणार याचा अभिमान वाटतो. यामुळे सरकार दरबारी मंडळांचे विविध प्रश्न सुटण्यासही मोठी मदत होणार आहे.’’

– पुनीत बालन
उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : शिवानी व विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune News : ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पुणे पोस्टमास्टर जनरल कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ संपन्न

BREAKING NEWS: मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Pune Manchar Accident

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - February 17, 2024 0
पुणे : पुण्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात (Pune Manchar Accident) झाला आहे. कार-टेम्पो-कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा जळून मृत्यू…
Murder

Pune Crime News : धक्कादायक ! मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; हपडसरमधील घटना

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या…

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीवर शरद पवार म्हणाले, ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास…’

Posted by - February 2, 2022 0
बारामती- काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. राज्य…
Pune-PMC

Pune Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर

Posted by - September 2, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही गणेशोत्सवासाठीच्या (Pune Ganeshotsav 2023) नियोजनासाठी तयारी सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *