डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

518 0

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

 

येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्यास भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन वन वाचविण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यंत करीत आहेत. पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळणे गरजेचे आहे. पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्यादृष्टीने परिसरात पोलीसाची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अभयारण्य परिसरात पुणे महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवावी. नागरिकांनी या पक्षी अभयारण्याला भेट द्यावी आणि पर्यावरणाच्यादृष्टीने पुण्यातील हिरवे आच्छादन टिकवण्यासाठी झाडाची लागवड करावी असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाप्रती जागरुक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या कामांची माहिती दिली.

Share This News

Related Post

Pune University Fight

Pune University : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Posted by - November 1, 2023 0
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन (Pune University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार…
Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

Posted by - November 10, 2023 0
पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ…

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर…

पुणे : विमाननगर परिसरात झाडपडीच्या घटनेत चारचाकी वाहनाचे नुकसान

Posted by - August 5, 2022 0
पुणे : अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . अनेक ठिकाणी…
Dagdusheth Ganpati

दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

Posted by - May 19, 2023 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *