Pune News

Pune News : ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पुणे पोस्टमास्टर जनरल कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ संपन्न

585 0

पुणे : कार्यालयीन पर्यावरणाला हिरवा स्पर्श देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना (Pune News) त्याचे संवर्धन करण्याच्या भूमिकेबद्दल जागरुक करण्यासाठी, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, पुणे क्षेत्र, पुणे 411001, यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने दिनांक 5 जून रोजी कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ आयोजित केला. झाडे आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी कर्मचारी आणि सर्व जनतेमध्ये सामाजिक जबाबदारीचे मूल्य रुजवण्याची ही एक आदर्श संधी साधण्यात आली.

श्री रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे विभाग यांच्या हस्ते कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोस्टमास्तर जनरल कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना श्री रामचंद्र जायभाये यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व त्याचे संवर्धन याविषयी सांगितले. ते म्हणाले की, ‘झाड लावणे, त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तरच आपण आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले वातावरण देऊ शकतो.’

या कार्यक्रमामुळे आपल्या सभोवतालच्या हिरवाईबद्दल जागरुकता आणण्यास मदत झाली. त्यामुळे वनस्पती आणि मानव यांच्यातील बंध दृढ होण्यास मदत होऊन वृक्षारोपणामधून देखील खूप काही शिकायला मिळाले त्यामुळे या प्रसंगाच्या आठवणी कायमच जपल्या जातील. श्री रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे विभाग यांनी या प्रसंगी नियमितपणे अधिकाधिक झाडे लावावीत आणि त्यांचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

BREAKING NEWS: मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!