Bajrang Sonawane Accident

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

558 0

बीड : नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane Accident) यांनी विजय मिळवला. बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदरवारी देण्यात आली होती. मात्र आता बीडमधून एक मोठी बातमी समोर आली. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.

रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.

बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.हा अपघात इतका भीष होता की या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!