आत्महत्या की घातपात ? पाण्याच्या टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पुण्यातील हांडेवाडी परिसरात खळबळ

5280 0

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत नाही. पाण्याच्या टँकर मधून पाणी येत नसल्याने टँकरचे झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये घडली. याच भागात राहणाऱ्या कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) या महिलेचा हा मृतदेह आहे. ही महिला घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा थेट मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर विविध भागांमध्ये पाणी पोहोचवल्यानंतर संध्याकाळी ससाणे यांनी टँकर आपल्या घराजवळ पार्क केला होता. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. गुरुवारी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर पाणी भरण्यासाठी बाहेर काढला. रामटेकडी येथे त्यात पाणी भरले व टँकर घेऊन ते फुरसूंगी परिसरातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका ठिकाणी पाणी पोचवण्याकरिता गेले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर पाण्याच्या टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे पाण्याच्या पाईप मध्ये काही बिघाड झाला असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी सुरुवातील पाण्याचा पाईप तपासला त्यात काहीच आढळून आले नाही म्हणून वॉल्व्ह तपासला. सगळे काही दुरुस्त असूनही पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिले असता साडीचे कापड आढळून आले. साडी टँकर मध्ये कशी आली हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचे झाकण उघडले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. थोड्याच वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, या महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने हांडेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही महिला नेमकी घरातून का निघून गेली होती ? तिने स्वतः या टँकरमध्ये आत्महत्या केली की खून करून हा मृतदेह टँकरमध्ये टाकण्यात आला, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा…

लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनलाही टाकलं मागे; तब्बल इतक्या लोकसंख्येसह भारत बनला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

Posted by - April 19, 2023 0
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात…

रशिया-युक्रेन संकटात सोन्याने विक्रमी पातळी गाठली ! किंमत 51,000 ओलांडली

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की…
Supriya Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 19, 2023 0
पुणे : बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए (PMRDA) परिसराचा…

” महाराष्ट्र लढवय्यांचा…कष्टकरी शेतकऱ्यांचा , रडायचं नाही, लढायचं…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजाला दिला दिलासा

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *