जुन्नरमध्ये व्यावसायिकाची हत्या ! मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला

25524 0

व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते. पोलिसांनी पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९ वर्ष) व महेश गोरकनाथ कसाळ (वय ३० वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे घडली.

पोलिसांनी माहितीनुसार, आरोपींनी किशोर तांबे यांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. दारू पिताना आरोपी आणि तांबे यांच्यात वादावादीस सुरुवात झाली. मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे आमची बदनामी करतो या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पांडुरंग तांबे याने मित्राच्या मदतीने किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यातच तांबे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुरावे गायब करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह पोत्यात भरला आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड भरले. हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.

दरम्यान, किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती. पोलिसांना त्यांचा शोध सुरु केला. तपासाची चक्रे फिरवत परिसराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना मृतदेह तिथून जवळच असलेल्या विहिरीत आढळला.

Share This News

Related Post

Dagdusheth Ganpati

Chandrayaan 3 : चंद्रयानच्या यशस्वी लँडिंग साठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

Posted by - August 23, 2023 0
पुणे : भारताची चंद्रयान (Chandrayaan 3) मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई…

‘तू मला आवडत नाहीस..’; पतीचे बोलणे जिव्हारी लागल्याने विवाहितेने उचलले ‘हे’ धक्कदायक पाऊल

Posted by - May 4, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : काही वेळा व्यक्ती रागाच्या भरात असे काही बोलून जातो कि ते बोलणे समोरच्या व्यक्तीच्या जिव्हारी लागते. अशीच…

#PUNE : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - January 23, 2023 0
पिंपरी : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या मागे…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : वारणा नदीच्या पुलावरून बस कोसळून कोल्हापुरात भीषण अपघात

Posted by - November 9, 2023 0
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही…

‘वसंत मोरे यांची निष्ठा राज ठाकरे यांच्यासोबतच !’… पाहा वसंत मोरे यांची exclusive मुलाखत

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांची पुढील भूमिका काय असणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *