Manoj Jarange

विधानसभा लढवणारच! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; 127 विधानसभा जागांचा सर्व्हे पूर्ण

3131 0

राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झालेले पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर अजूनही सकारात्मक भूमिका आलेली नाही. तसा अध्यादेशही निघालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा मोर्चातर्फे 288 जागांवर उमेदवार देऊ, अशी घोषणा जरांगे यांनी याआधी केली आहे. त्याच अनुषंगाने विधानसभेच्या 127 जागांवर त्यांचा सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे, अशी माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आमच्याकडून वेळ मागून घेतली आहे. मात्र आम्ही याआधीही सांगितले आहे की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. माझा आणि माझ्या मराठा समाजाचा राजकरणात येण्याचा उद्देश नाही पण हे सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. त्यामुळेच आम्ही आता शांत बसणार नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता, वेळप्रसंगी मराठा, दलित, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवू. सर्व समाज आमच्या बरोबर आले पाहिजे यासाठी प्रयत्न करू. या सरकारने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर विधानसभेला आमचे उमेदवार उभे करू. त्यासाठीच 127 जागांवर आम्ही सर्व्हे देखील केला आहे. पुढच्या टप्प्यात आणखी काही जागांची चाचपणी करणार आहोत. मात्र हे उमेदवार उभे करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन करणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे अद्याप ठरवलेले नाही.

 

मनोज जरांगे पाटील हे 288 जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगत आहेत. मात्र यामध्ये ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जरांगे यांनी कोणत्या जागांवर सर्व्हे केला आहे. त्यांचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीदेखील विधानसभेत 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करू अशी घोषणा केली आहे. त्यापैकी 199 जागांवर सर्व्हे केला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे आता हा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळण्याचे शक्यता आहे.

Share This News

Related Post

accident

राज ठाकरेंच्या सभेसाठी रत्नागिरीला निघालेल्या मनसे नेत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 6, 2023 0
रत्नागिरी : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी या ठिकाणी एक जाहीर सभा आहे. या सभेसाठी मनसे नेते वेगवेगळ्या…

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Posted by - June 1, 2022 0
पुणे – राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती…

माजी कायदामंत्री शांती भूषण यांचं निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - January 31, 2023 0
नवी दिल्ली: माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि वकील शांती भूषण यांचे मंगळवारी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. भूषण यांनी…
Swaminathan Janakiraman

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन यांची नियुक्ती

Posted by - June 20, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदी स्वामिनाथन जानकीरामन ( Swaminathan Janakiraman)…
Mahadev App

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात नवी अपडेट; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *