पंतप्रधान मोदी माफी मागा ; पुण्यात काँग्रेसचं आंदोलन (व्हिडिओ)

428 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानाजवळ “माफी मागो” आंदोलन करण्यात आले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला. या आंदोलनात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, संजय बालगुडे, काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे”

Share This News

Related Post

PUNE POLICE TRANSFERS : पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Posted by - September 15, 2022 0
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहेत. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त…

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Posted by - April 10, 2022 0
वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप…

घोषणा देतानाच अस्वस्थ वाटलं… युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे हार्टअटॅकने निधन

Posted by - April 6, 2023 0
ठाणे शहरात आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या…

शंभर पेक्षा जास्त जागा जिंकू, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना विश्वास

Posted by - February 1, 2022 0
पुणे- भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढविश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *